राज्यस्तरीय वैचारिक स्पर्धेत जनता ब ऊ.मा विद्यालयाचे विद्यार्थी प्रथम.
डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स शाखा नागपूर तर्फे 06 डिसे 2024 ला आयोजित राज्यस्तरीय वैचारिक अभिवादन प्रश्नोत्तरी परीक्षेत जनता ज्युनिअर कॉलेज नागभीडचा विद्यार्थी सुगीत एम जांभुळे वर्ग 11 वी गट-अ मधून प्रथम येऊन 17 हजार रुपयाचे धनादेशाच्या स्वरूपात रोख पारितोषिकाचा मानकरी ठरला तसेच वर्ग 11 वी ची विद्यार्थिनी अंजू वाढनकर ही प्रोत्साहनास्पर दोन हजार रुपयांच्या धनादेश बक्षिसाची मानकरी ठरली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी. ठाकरे सर उपप्राचार्य बि.के चूटे सर पर्यवेक्षक चक्रधरजी रोहनकर सर तसेच वैचारिक प्रतियोगिता परीक्षा चे समन्वयक मायकेल बोरकर सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या परीक्षेस राज्यभरातून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी आपलं नाव नोंदविले होते. जनता ब.ऊ.मा विद्यालयातून या परीक्षेत प्रथमताच सहभाग नोंदवून 200 विद्यार्थी परीक्षेत उपस्थित झाले होते.बाबासाहेब आंबेडकरांचे उदात्त विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याकरिता तसेच विद्यार्थांना ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण करण्याच्या हेतूने ही असोसिएशन वर्षभर विविध उपक्रम राबवित असते.
परीक्षेच्या यशस्वी ते करिता एन ए मेश्राम, प्रमोद बोरकर, राजू पाटील, विलास धात्रक, राजेंद्र मेश्राम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
Comments
Post a Comment